citynewsLatest NewsMaharashtra

मुंबईत व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षांचे पारंपरिक महाराष्ट्रीय स्वागत; ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष

मुंबई | प्रतिनिधी
व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचे एक दिवसीय दौऱ्यानिमित्त आज मुंबईत आगमन झाल्यानंतर त्यांचे पारंपरिक महाराष्ट्रीय पद्धतीने भव्य स्वागत करण्यात आले. मुंबईतील हॉटेल ट्रायडेंट येथे आयोजित स्वागत समारंभात महाराष्ट्राच्या संस्कृतीची झलक पाहायला मिळाली.

‘बिझनेस फोरम’ कार्यक्रमासाठी उच्चस्तरीय शिष्टमंडळासह मुंबईत दाखल झालेल्या राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचे राजशिष्टाचार आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले.

ढोल-ताशे, लेझीम आणि तुतारींच्या गजरात स्वागत

स्वागत समारंभादरम्यान ढोल-ताशांचा गजर, लेझीमचे सादरीकरण आणि तुतारीच्या निनादाने वातावरण दुमदुमून गेले. याशिवाय शंखनाद आणि टाळ-मृदंगाच्या तालावर पारंपरिक लोकनृत्य सादर करत राष्ट्राध्यक्षांचे स्वागत करण्यात आले.

महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचं दर्शन घडवणाऱ्या या कार्यक्रमाने व्हिएतनामी शिष्टमंडळाचं विशेष लक्ष वेधून घेतलं.

भारत-व्हिएतनाम संबंधांना नवी दिशा

राष्ट्राध्यक्ष तो लाम यांच्या या दौऱ्यादरम्यान भारत आणि व्हिएतनाम यांच्यात व्यापार, गुंतवणूक आणि उद्योग क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.

मुंबईत झालेल्या या पारंपरिक स्वागतामुळे दोन्ही देशांमधील सांस्कृतिक आणि राजनैतिक संबंध अधिक दृढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button