तोरनाळा अपघातात पती-पत्नी ठार; चिमुकल्याकडून आई-वडिलांना अग्नीदान, सावळदबारा गाव शोकमग्न

तोरनाळा परिसरात घडलेल्या भीषण अपघाताने सावळदबारा गावावर शोककळा पसरली आहे… पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून, अवघ्या लहानग्या मुलाकडून आई-वडिलांना अग्नीदान देण्याचा हृदयद्रावक प्रसंग घडला आहे… पाहूया सविस्तर…
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा गावातील खडके कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे…
दि. २२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास गोपाळ वासुदेव खडके (वय ३५) आणि त्यांची पत्नी सोनाली खडके (वय ३०) हे जामनेरहून आपल्या गावी परतत होते…
मात्र तोरनाळा परिसरात त्यांच्या दुचाकीला मागून येणाऱ्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली…
या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला…
या अपघातात त्यांची दीड वर्षांची मुलगी मुक्ताई ही किरकोळ जखमी होऊन थोडक्यात बचावली…
घटनेची माहिती मिळताच फत्तेपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला…
मृतदेह शवविच्छेदनासाठी जामनेर येथे पाठविण्यात आले…
२३ एप्रिल रोजी सावळदबारा येथे दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले…
यावेळी अवघ्या सहा वर्षांच्या मुलाने आपल्या आई-वडिलांना अग्नीदान दिल्याचा हृदयद्रावक प्रसंग घडला…
हा क्षण पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले…
या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे…
एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करणारा हा अपघात अनेक प्रश्न निर्माण करून जातो…
वाहतूक नियमांचे पालन आणि सुरक्षितता याकडे दुर्लक्ष किती महागात पडू शकते, याची ही जाणीव करून देणारी घटना आहे…



