citynewsLatest NewsLocal NewsMaharashtraNanded

भरधाव कार थेट शेतातील आखाड्यात घुसली; झाडाखाली बसलेल्या महिलेचा जीव धोक्यात

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील लोन गावाजवळ भरधाव कारने थेट शेतातील आखाड्यात घुसून भीषण अपघात घडवला. या अपघातात झाडाखाली विसाव्यासाठी बसलेली एक महिला गंभीर जखमी झाली असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तामसा येथून येणारी एक स्विफ्ट कार लोन गावाजवळून जात असताना चालकाचा अचानक वाहनावरील ताबा सुटला. त्यानंतर कार रस्त्याबाहेर जाऊन थेट शेतातील आखाड्यात घुसली.

यावेळी शेतात एका झाडाच्या सावलीत एक महिला बसली होती. भरधाव कारने या महिलेला जोरदार धडक दिली. या धडकेत महिला गंभीर जखमी झाली असून, कारचेही मोठे नुकसान झाले आहे.

घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी महिलेला बाहेर काढले. त्यानंतर तिला उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

या अपघातामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, भरधाव वाहनांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी होत आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button