citynewsYavatmal

यवतमाळात गणरायाचे विठुमाऊली रूप; भक्ती आणि सामाजिक एकतेचा संदेश

शेटे परिवाराच्या घरी दिवे घाटातील पालखी सोहळ्याचा नयनरम्य देखावा; समता, बंधुभाव आणि माणुसकीचा संदेश

यवतमाळच्या अमराई परिसरातील शेटे परिवाराच्या घरी यंदा गणरायाचे विठुमाऊलीच्या रूपातील आगळेवेगळे दर्शन घडत आहे. विश्वनाथ शंकरराव शेटे यांच्या निवासस्थानी साकारण्यात आलेल्या या आकर्षक देखाव्यातून भक्तीसोबतच सामाजिक एकता, समता आणि माणुसकीचा संदेश देण्यात आला आहे.

शेटे परिवाराकडून दरवर्षी गणेशोत्सवात सामाजिक आणि सांस्कृतिक संदेश देणारे विविध देखावे साकारले जातात. यंदाही ही परंपरा कायम ठेवत दिवे घाटातून मार्गक्रमण करणाऱ्या माऊलीच्या पालखी सोहळ्याचा नयनरम्य देखावा साकारण्यात आला आहे. पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांमधील बंधुभाव, एकोपा आणि समानतेची भावना देखाव्यातून प्रभावीपणे मांडण्यात आली आहे.

देखाव्यात संतांनी समाजाला दिलेले समता, प्रेम, भक्ती आणि माणुसकीचे संदेश देणारे फलकही लावण्यात आले आहेत. भक्ती ही केवळ पूजा न राहता माणसाला माणसाशी जोडणारी शक्ती आहे, हा विचार या माध्यमातून मांडण्यात आला आहे.

गणरायाचे विठ्ठल रूप आणि माऊलीच्या पालखी सोहळ्याचा देखावा भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकतेचा संदेश देणाऱ्या शेटे परिवाराच्या या उपक्रमाची परिसरात चर्चा असून, भाविकांकडून देखाव्याचे कौतुक केले जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button