citynewsMaharashtraNagpur

हळदीरामच्या आउटलेटमध्ये जेवणातून किडे निघाल्याचा आरोप

ओरिएंटल सिझलरच्या लाकडी बेसमधून किडे बाहेर आल्याचा कुटुंबाचा दावा; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

नागपुरातील मेडिकल चौक परिसरातील प्रसिद्ध हळदीराम आउटलेटमध्ये एका कुटुंबाला जेवणादरम्यान धक्कादायक अनुभव आल्याचा दावा करण्यात आला आहे. कुटुंबाने ऑर्डर केलेल्या ओरिएंटल सिझलरच्या लाकडी बेसमधून अनेक किडे बाहेर आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ तसेच रेस्टॉरंटचे बिल सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्याची माहिती आहे.

कुटुंबाच्या दाव्यानुसार, जेवण जवळपास संपत आले असताना सिझलर ज्या लाकडी बेसवर सर्व्ह करण्यात आला होता, त्या बेसमधून अनेक किडे बाहेर येताना दिसले. हे किडे वाळवीसारखे दिसत असल्याचेही कुटुंबाने म्हटले आहे. प्रकार लक्षात आल्यानंतर संबंधितांनी त्याचा व्हिडिओ काढल्याचा दावा केला आहे.

या घटनेनंतर रेस्टॉरंटमध्ये वापरण्यात येणाऱ्या लाकडी बेससह इतर लाकडी सर्व्हिंग साहित्याची स्वच्छता व सुरक्षिततेच्या दृष्टीने तपासणी करण्याची मागणी केली जात आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ आणि बिल शेअर झाल्यानंतर या प्रकाराची चर्चा सुरू झाली आहे.

मात्र, व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या किड्यांचा नेमका प्रकार काय होता, याची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. तसेच या आरोपांबाबत हळदीराम व्यवस्थापनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नसल्याने, संपूर्ण प्रकाराबाबत अधिकृत तपासणी किंवा स्पष्टीकरणानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button