citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur gramin

ऑपरेशन ‘थंडर 2.0’ अंतर्गत गुन्हे शाखेची मोठी कारवाई; नागपुरात 85 किलो गांज्यासह 48 लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 3 ने ‘ऑपरेशन थंडर 2.0’ अंतर्गत मोठी कारवाई करत जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतून तब्बल 85 किलो गांजा जप्त केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, एक आरोपी अद्याप फरार आहे.

ही कारवाई 19 एप्रिल 2026 रोजी रात्री 8.05 ते 11.55 या वेळेत निर्मल कॉलनीतील प्लॉट क्रमांक 132/133 येथे करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या घराची पंचांसमक्ष झडती घेण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात गांजा आणि इतर साहित्य आढळून आले.

या प्रकरणात फिरोज खान सरदार खान (वय 49, रा. बाबा बगदादिया नगर, झिंगाबाई टाकळी) आणि मोहम्मद शकील मोहम्मद भूरू (वय 55, रा. कुंदनलाल गुप्ता नगर, नुरी मदरसा परिसर, यशोधरानगर) यांना अटक करण्यात आली आहे.

तर हरपितसिंग उर्फ ‘हॅप्पी’ (रा. कपिलनगर, नागपूर) हा या प्रकरणातील पाहिजे आरोपी असून, त्याचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी आरोपींकडून अंदाजे 21 लाख 25 हजार रुपये किमतीचा 85 किलो गांजा, 41 हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल फोन, 4 हजार रुपयांचा वजनकाटा आणि 27 लाख रुपये किमतीची तीन चारचाकी वाहने असा एकूण 48 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी जरीपटका पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम 8(क), 20(ब)(2)(क) आणि 29 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जरीपटका पोलिसांकडून सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button