‘मृत्यूचा सापळा’ बनलेला रस्ता! सुलतानपूर–मेहकर–हिवरा आश्रम मार्गावर भीषण अपघातांचा धोका

मेहकर : सुलतानपूर ते मेहकर आणि पुढे हिवरा आश्रमदरम्यानचा रस्ता सध्या प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत असून, ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या भेगांमुळे अपघातांची मालिका सुरू आहे. या रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, नागरिकांनी त्याला थेट “मृत्यूचा सापळा” असे संबोधायला सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ९ एप्रिलच्या रात्री या रस्त्यावर पडलेल्या भेगांमुळे एका महिलेचा गंभीर अपघात झाला. दुचाकी घसरल्याने तिच्या डोक्याला जबर मार लागला असून ती सध्या मृत्यूशी झुंज देत आहे.
⚠️ दररोज अपघात, प्रशासन मात्र निष्क्रिय
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार —
👉 या मार्गावर दररोज छोटे-मोठे अपघात घडत आहेत
👉 रस्त्यावरील खोल भेगा आणि खड्डे हेच अपघातांचे मुख्य कारण
👉 दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांना मोठा धोका
मात्र, या गंभीर समस्येकडे MSRDC आणि संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
😡 नागरिकांचा इशारा
रस्त्याची तातडीने दुरुस्ती न केल्यास —
👉 मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे
❗ मोठा प्रश्न
👉 आणखी किती अपघातानंतर प्रशासन जागं होणार?
👉 नागरिकांच्या जीवाशी चाललेला हा खेळ थांबणार कधी?
📺 या प्रकरणातील पुढील अपडेटसाठी पाहत राहा — सिटी न्यूज



