citynewsLatest NewsMaharashtraNanded

नांदेडमध्ये गँगवॉरचा थरार! ३ दिवसांत ५ खून — ‘सिंघम’ स्टाईलमध्ये SP रस्त्यावर

नांदेड शहरात गेल्या काही दिवसांपासून गँगवॉरने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अवघ्या तीन दिवसांत ५ जणांची हत्या झाल्याने संपूर्ण शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मात्र, आता या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी पोलीस प्रशासन आक्रमक झाले आहे.


🚨 SP स्वतः मैदानात

नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी स्वतः पुढाकार घेत
👉 मध्यरात्री दुचाकीवरून शहरातील गल्लीबोळात पेट्रोलिंग सुरू केलं
👉 ‘व्हिजिबल पोलिसिंग’ वाढवत गुन्हेगारांना थेट इशारा दिला


⚔️ कोम्बिंग ऑपरेशनमध्ये मोठी कारवाई

👉 पोलिसांनी विशेष मोहीम राबवत
👉 तब्बल २५ सराईत गुन्हेगारांना अटक केली
👉 गुन्हेगारांची ५ किमी धिंड काढत दहशत मोडण्याचा प्रयत्न


🎤 SP अबिनाश कुमार म्हणाले —

“शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी आम्ही व्हिजिबल पोलिसिंगवर भर देत आहोत. गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक निर्माण व्हावा आणि नागरिकांना सुरक्षित वाटावं, यासाठी नाईट पेट्रोलिंग आणि सरप्राईज चेकिंग सुरूच राहील.”


⚠️ शहरात दहशतीचं वातावरण

👉 किरकोळ कारणांवरून गँगवॉर भडकत आहे
👉 सलग हत्यांमुळे नागरिकांमध्ये भीती


❗ पुढे काय?

SP यांच्या या ‘सिंघम’ स्टाईल अ‍ॅक्शनमुळे
👉 गुन्हेगारांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे
👉 मात्र, गुन्हेगारी पूर्णपणे आटोक्यात येते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे


📺 नांदेडमधील प्रत्येक मोठ्या अपडेटसाठी पाहत राहा — सिटी न्यूज

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button