नागपूरमध्ये चोरांचा हैदोस! एका रात्रीत 4 दुकानांवर डल्ला — 4.12 लाखांची रोकड लंपास

नागपूर शहरात चोरीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, लकडगंज परिसरात चोरट्यांनी एका रात्रीत तब्बल चार दुकानांना लक्ष्य करत व्यापाऱ्यांची झोप उडवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ६ एप्रिलच्या रात्री किराणा ओळी परिसरात ही घटना घडली. चोरट्यांनी एकामागून एक दुकानांची कुलपे तोडत आत प्रवेश केला आणि रोख रकमेवर हात साफ केला.
👉 नवदुर्गा किराणा स्टोअर्सचे मालक धीरज पुरे यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद केले होते. मात्र सकाळी दुकानाचे कुलूप तुटलेले आणि कॅश गायब असल्याचे आढळले.
👉 श्रीकांत लितुया यांच्या दुकानातही चोरट्यांनी अशीच चोरी केली.
👉 तर विशाल रुडिया आणि दिलीप जैन यांच्या दुकानांवरही प्रयत्न करण्यात आला, मात्र तेथे चोरटे अपयशी ठरले.
या संपूर्ण घटनेत सुमारे ४ लाख १२ हजार रुपयांची रोकड लंपास झाल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच लकडगंज पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून तपास सुरू करण्यात आला असून, परिसरातील CCTV फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, वाढत्या चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
👉 “नागपूरमध्ये वाढणाऱ्या गुन्हेगारीला आळा कधी बसणार?” असा सवाल व्यापारी वर्गातून उपस्थित केला जात आहे.
पोलिसांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
📺 नागपूरमधील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा — सिटी न्यूज



