सोन्याच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांना दिलासा, चांदीतही नरमाई

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या सोन्याच्या दरांमध्ये आज मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. त्यामुळे खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. दोन आठवड्यांपूर्वी घसरणीनंतर पुन्हा वाढलेल्या सोन्याच्या दरांनी ग्राहकांची चिंता वाढवली होती. मात्र आज अचानक दरात झालेल्या घसरणीमुळे बाजारात उत्साहाचे वातावरण आहे.
आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा तब्बल २,३४० रुपयांची घसरण झाली असून दर १,५१,४८० रुपयांवर आले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचा दर १,२१,१८४ रुपये इतका झाला आहे. तर १० तोळ्यांसाठी सोन्याचा दर १५,१४,८०० रुपयांवर पोहोचला आहे.
२२ कॅरेट सोन्याबाबत बोलायचे झाल्यास, प्रति तोळा २,१५० रुपयांची घसरण झाली असून दर १,३८,८५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅमसाठी हा दर १,११,०८० रुपये इतका आहे. १० तोळ्यांसाठी १३,८८,५०० रुपये दर नोंदवण्यात आला आहे.
१८ कॅरेट सोन्याच्या दरातही घसरण झाली आहे. प्रति तोळा १,७६० रुपयांनी कमी होत दर १,३६,६१० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅमसाठी ९०,८८८ रुपये तर १० तोळ्यांसाठी ११,३६,१०० रुपये दर नोंदवला गेला आहे.
आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सोन्याच्या दरात चढ-उतार होत असून, विशेषतः इराण-इस्त्रायल संघर्ष थांबण्याच्या संकेतांमुळे बाजारावर परिणाम झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.



