Amaravti GraminAmravaticitynewsLatest NewsMaharashtra

अमरावतीत अतिक्रमणधारकांवर बुलडोझरचा धडक प्रहार! बडनेरा जुनी वस्तीतील पक्की घरे जमीनदोस्त

अमरावती शहरात अतिक्रमणाविरोधात महानगरपालिकेने पुन्हा एकदा कडक भूमिका घेत सलग दुसऱ्या दिवशी धडक कारवाई केली आहे. बडनेरा जुनी वस्ती परिसरात शासकीय जागांवर उभारलेली पक्की घरे बुलडोझरच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार ही मोहीम राबवण्यात आली. झोन क्रमांक ४ चे उपअभियंता, सहाय्यक संचालक आणि जागा निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख श्याम चवरे यांच्या नेतृत्वात कारवाई पार पडली.

👉 गांधी विद्यालयाजवळील पक्की अतिक्रमित घरे
👉 विठ्ठल वाडी परिसरातील डीबी रोडवरील टिनशेड घरे

या सर्वांवर बुलडोझर फिरवत अतिक्रमण हटवण्यात आले. यावेळी अतिक्रमित घरांमधील साहित्यही जप्त करण्यात आले.

कारवाईची माहिती आधीच मिळाल्याने काही नागरिकांनी स्वतःहून घरे रिकामी केली, तर काहींनी कारवाई सुरू असतानाच आपले सामान काढून घेतले. विशेष म्हणजे, संपूर्ण कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

या मोहिमेसाठी बडनेरा आणि अमरावती पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता, त्यामुळे परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात राहिली.

मनपाच्या या कठोर कारवाईमुळे शहरातील इतर अतिक्रमणधारकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील काळातही अशाच प्रकारच्या मोहिमा सुरू राहणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

👉 शासकीय जागांवर अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात आता प्रशासन आक्रमक झाले असून, नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे… अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.

📺 ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा — सिटी न्यूज

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button