citynewsIndia NewsLatest Newspolitics

आपमध्ये मोठी राजकीय घडामोड! राघव चड्ढा यांना उपनेतेपदावरून हटवण्याची मागणी; अशोक मित्तल यांची नियुक्ती प्रस्तावित

नवी दिल्ली | प्रतिनिधी
आम आदमी पार्टी (AAP) मध्ये मोठी राजकीय हालचाल घडताना दिसत असून पक्षाने राज्यसभेच्या सचिवालयाला पत्र लिहून खासदार राघव चड्ढा यांना उपनेतेपदावरून हटवण्याची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, AAP ने राज्यसभेत पक्षाच्या उपनेतेपदी खासदार अशोक मित्तल यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या संदर्भात गुरुवारी (२ एप्रिल २०२६) राज्यसभा सचिवालयाला अधिकृत पत्र पाठवण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, या पत्रात राघव चड्ढा यांना पक्षाच्या कोट्यातून सभागृहात बोलण्यासाठी वेळ देऊ नये, अशीही मागणी करण्यात आली आहे.

गेल्या काही काळापासून राघव चड्ढा हे पक्षाच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर मौन बाळगून असल्याचे आणि पक्षप्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहिल्याचे दिसून आले आहे. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दरम्यान, या निर्णयामुळे आपमध्ये अंतर्गत मतभेद उफाळून येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून पुढील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button