Crime NewsLatest NewsNagpur

पती-पत्नीच्या वादात मध्यस्थी महागात! बेल्टने मारहाण, तरुण जखमी

छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली असून, पती-पत्नीच्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिडको परिसरातील सनी सेंटर भागात रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला. प्रमोद भास्कर तांगडे (वय 29) हे सेंट्रिंगचे काम करतात. ते आपल्या नातलगांना सोडून घरी परतत असताना आंबेडकर चौकाजवळ अपघात पाहून मदतीसाठी थांबले होते.

याच दरम्यान, श्रीमंत मगरे हा घटनास्थळी आला आणि “तू आमच्या पती-पत्नीच्या भांडणात मध्यस्थी का करतो?” असा जाब विचारत त्याने प्रमोद तांगडे यांच्यावर हल्ला चढवला. कमरेच्या बेल्टने मारहाण केल्याने तांगडे जखमी झाले.

घटनेनंतर जखमी प्रमोद तांगडे यांनी तात्काळ सिडको पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे. श्रीमंत मगरे हा जटवाडा रोडवरील अंबरहिल परिसरात राहणारा असून पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेत पुढील तपास सुरू केला आहे.

या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, “मध्यस्थी करायलाही आता जीवावर बेतते का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button