citynewsFestival NewsLatest NewsMaharashtraWashim

वाशिमच्या धनज बुद्रुकमध्ये रमजान ईद उत्साहात; हिंदू-मुस्लिम एकतेचं सुंदर दर्शन

“धर्म वेगळे असले तरी मनं एक असतात…” याचाच सुंदर संदेश देणारं प्रेरणादायी चित्र वाशिम जिल्ह्यातून समोर आलं आहे. धनज बुद्रुक येथे रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करताना हिंदू-मुस्लिम एकतेचं अनोखं दर्शन घडलं. बंधुभाव, एकात्मता आणि शांततेचा संदेश देणारा हा सोहळा ठरला.

वाशिम जिल्ह्यातील धनज बुद्रुक येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पहाटेपासूनच गावात उत्सवी वातावरण पाहायला मिळाले.

रमजान ईदच्या पवित्र निमित्ताने मुस्लिम बांधवांनी एकत्र येत एकात्मता, बंधुभाव, सुख-समृद्धी आणि देशात शांतता नांदावी यासाठी सामूहिक प्रार्थना केली. त्यानंतर ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यात आली.

नमाजानंतर सर्वांनी एकमेकांची गळाभेट घेत “ईद मुबारक”च्या शुभेच्छा देत आनंद साजरा केला. विशेष म्हणजे, या प्रसंगी हिंदू आणि मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने एकत्र येत सामाजिक सलोखा आणि ऐक्याचा संदेश दिला.

कार्यक्रमाला ठाणेदारांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. धर्म आणि जातिभेद विसरून एकत्र येणारा हा सोहळा म्हणजेच खरी भारतीय संस्कृती असल्याचे यावेळी अधोरेखित झाले.

“धर्मापेक्षा मानवता मोठी… आणि एकतेतच ताकद असते,” याचं जिवंत उदाहरण म्हणजे धनज बुद्रुकमधील रमजान ईद साजरी करण्याचा हा सोहळा.
अशा उपक्रमांमधून समाजात सौहार्द आणि बंधुभाव अधिक दृढ होत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button