City CrimecitynewsCrime NewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur gramin

नागपूरमध्ये वाहनचोर टोळीवर कारवाई; सराईत आरोपी अटकेत, चार दुचाकी जप्त

नागपूर, प्रतिनिधी :
नागपूर शहरात वाहन चोरी करणाऱ्या टोळीवर सदर पोलिसांनी कारवाई करत एका सराईत आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून तब्बल चार दुचाकी वाहने जप्त करण्यात आली असून शहरातील विविध भागांतील वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

नागपूर शहरातील सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्याचा पोलिसांनी यशस्वी छडा लावला आहे. 20 फेब्रुवारी 2026 रोजी रात्रीच्या सुमारास फिर्यादी तहेर अख्तर आदम ईसा हे नमाज पठणासाठी छोटी मस्जिद येथे गेले होते. त्यांनी आपली पांढऱ्या रंगाची होंडा अ‍ॅक्टिवा ही दुचाकी मस्जिदसमोर पार्क केली होती. मात्र नमाज आटोपून परत आल्यानंतर त्यांची गाडी चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.

या प्रकरणी सदर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की ‘रॉनी’ नावाचा युवक नागपूर शहरातील विविध भागांतून वाहन चोरी करत आहे.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून रेनॉल्ड उर्फ रॉनी किस्टोफर रामटेके (वय 22) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने छोटी मस्जिद परिसरातून अ‍ॅक्टिवा चोरी केल्याची कबुली दिली. पुढील तपासात आरोपीकडून आणखी तीन दुचाकी वाहने जप्त करण्यात आली.

जप्त करण्यात आलेल्या वाहनांची एकूण अंदाजे किंमत 1 लाख 30 हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

सध्या आरोपीकडून अधिक चौकशी सुरू असून इतर चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

नागपूर पोलिसांच्या या कारवाईमुळे वाहन चोरट्यांवर मोठा आळा बसण्याची शक्यता आहे. मात्र नागरिकांनीही आपली वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button