AmravatiLatest NewsSocial News

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात रक्तदान शिबीर संपन्न

विद्यापीठ आरोग्य केंद्र आणि प्राणिशास्त्र विभाग यांचा संयुक्त उपक्रम

अमरावती (दि. 02.03.2026) :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात आरोग्य केंद्र आणि प्राणिशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, उपकुलसचिव डॉ. सुलभा पाटील उपस्थित होते.

                यावेळी मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते म्हणाले, रक्तदान हे श्रेष्ठदान असून सर्वांनी रक्तदान करण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. रक्तदान करून आपण एका बाटलीद्वारे तीन लोकांचे प्राण वाचवू शकतो, असेही ते म्हणाले.

                प्रास्ताविक भाषणातून विद्यापीठ आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता थोरात यांनी रक्तदान शिबीर कार्यक्रमामागील भूमिका विषद केली. यावेळी डॉ. सुलभा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन अपेक्षा काळे हिने, तर आभार प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. हेमलता नांदुरकर यांनी मानले.

                कार्यक्रमाला परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी, भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. संदीप वाघुळे, उपकुलसचिव सौ. मोनाली तोटे पाटील, सौ. मिनल मालधुरे, श्री राहूल नरवाडे, डॉ. जयंत वडतकर, डॉ. प्रशांत शिंगवेकर, डॉ.व्ही.के. नागले, श्री राजेश पिडडी तसेच विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.   यावेळी 52 अधिकारी, कर्मचारी व विद्याथ्र्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता श्री राजेश पिदडी, आरोग्य विभागातील श्री सचिन बाळापुरे व श्री गुल्हाने यांनी अथक परिश्रम घेतलेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button