Crime NewsLatest NewsMaharashtraNagpur

नागपुरात संतापजनक प्रकार; दिव्यांग मुलीशी गैरवर्तनाच्या आरोपावरून वडिलांना अटक

नागपूर : नागपूर शहरातील मानकापूर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्वतःच्या दिव्यांग मुलीसोबत गैरवर्तन केल्याच्या गंभीर आरोपावरून वडिलांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणाची माहिती मानकापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिश खुवरगडे यांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी एक महिला तक्रारदार पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. तिने दिलेल्या तक्रारीत तिच्या पतीकडून — म्हणजेच पीडित मुलीच्या वडिलांकडून — वारंवार अश्लील वर्तन केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, आरोपी वडील मुलीसोबत अयोग्य स्पर्श (बॅड टच) करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी ही बाब तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा नोंद होताच मानकापूर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. प्राथमिक चौकशीनंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलगी दिव्यांग असून सध्या शिक्षण घेत आहे. तसेच आरोपी हा व्यवसायाने वकील असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button