राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धेत सहभागी होणा-या चमूंना कार्यशाळेतून मार्गदर्शन

विद्यापीठाच्या आविष्कार सेलचा प्रशंसनीय उपक्रम, 28 ते 31 जानेवारी रोजी परभणी येथे होणार राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धा
अमरावती (दि. 24.01.2026)- विद्यापीठस्तरावर पार पडलेल्या आविष्कार स्पर्धेत निवड झालेल्या 47 विद्याथ्र्यांची चमू येत्या 28 ते 31 जानेवारी, 2026 दरम्यान परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धेत सहभागी होणार आहे, त्याकरिता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या अविष्कार सेलच्यावतीने सदर चमूंसाठी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थी चमूंना तज्ज्ञांनी योग्य ते मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात डॉ. सुजाता काळे, डॉ. स्वाती शेरेकर, डॉ. हेमलता नांदुरकर, डॉ. कमलाकर मोरे, डॉ. प्रशांत ठाकरे, डॉ. नीरज घनवटे, डॉ. अनिता पाटील, डॉ. जागृती बारब्दे, डॉ. शितलबाबू तायडे, डॉ. दीपक चाचरकर, डॉ. संध्या भगत, प्रा. पल्लवी कांदळकर या तज्ज्ञांनी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, कृषी व पशुसंवर्धन, वैद्यक व फार्मसी, शुध्द विज्ञान, मानवविद्या-भाषा, ललित कला तसेच वाणिज्य – व्यवस्थापन व कायदा अशा विविध श्रेणींनुसार विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केले. दुस-या सत्रात डॉ. वर्षा नाठार, डॉ. प्रणव कोलते, डॉ. राजेश भोयर, डॉ. जयंत वडतकर यांनी महत्त्वपूर्ण सूचना, मूल्यांकन निकष तसेच राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी आवश्यक डूज अँन्ड डोन्टस याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ही कार्यशाळा आविष्कार सेलच्या समन्वयक डॉ. मनिषा कोडापे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.



