AmravatiEducation NewsLatest News

संकल्पनांना संशोधनाची जोड द्या – डॉ. योगेश ब्रााम्हणकर

विद्यापीठाच्या बायो टेक्नॉलॉजी विभागात ‘व्हिजीनरी : डॉ. योगेश ब्रााम्हणकर यांच्याशी संवाद’ कार्यक्रम संपन्न

अमरावती (दि. 24.01.2026) – आज आपल्याकडे सर्व सुविधा आहेत. परंतु पूर्वी अशा सुविधा नसतांनाही अनेकांनी नवोपक्रम घडविले, जे आपण आज सन्मानाने बघतो.  आपल्या आजुबाजुला सुध्दा असे नवोपक्रम सुरू असतात, मात्र आपण ते दुर्लक्षित करीत असतो. त्यामुळे आत्मवि·ाास जागवा, न्यूनगंड बाजूला ठेवा आणि आपल्यातील संकल्पनांना संशोधनाची जोड द्या. एवढ¬ावरच थांबू नका, तर आपल्या संशोधनाला बाजारपेठ सुध्दा मिळाली पाहिजे असे प्रयत्न करा. तेव्हाच तुमचे संशोधन ग्राहकापर्यंत पोहचून किंमत मिळेल, असे मार्गदर्शन भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयातील इनोव्हेशन सेलचे संचालक डॉ. योगेश ब्रााम्हणकर यांनी विद्याथ्र्यांना संबोधित करतांना केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील जैवतंत्रज्ञान विभागाच्यावतीने आयोजित ‘व्हिजनरी : डॉ. योगेश ब्रााम्हणकर यांच्याशी संवाद’ या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. प्रसाद वाडेगावकर, प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाच्या इनोव्हेशन, इन्क्युबेशन अॅन्ड लिंकेजेसचे संचालक डॉ. अजय लाड, इन्क्युबेशन सेंटरच्या प्रमुख प्रा. स्वाती शेरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आनंद यादव उपस्थित होते.
                डॉ. ब्रााम्हणकर मार्गदर्शन करतांना पुढे म्हणाले, कोणतेही साधन विकत घेत असतांना आपली जी वृत्ती असते, तीच संशोधनाकरिता सुध्दा वापरावी, जेणेकरुन ग्राहकांमधील वृत्ती आपल्या संशोधन निर्मितीत येईल. त्यानंतर आपले संशोधन साधन बाजारात आणून त्यातील उणीवा सुध्दा ग्राहकांकडून माहिती करुन घ्याव्यात. विदेशात होत असलेल्या नवोपक्रमांना पाहून आपल्याला हसू येईल, पण आपण ते करितच नाही. त्यामुळे आपल्यातील संकल्पना प्रत्यक्षात उतरवा. व्यापारी दृष्टीकोनातून आपल्या संशोधन साधनाकडे बघा असे सांगून प्रायोगिक तत्वावर अधिक भर द्या असेही ते म्हणाले. याप्रसंगी त्यांनी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देऊन संशोधन साधनांबाबत योग्य ते मार्गदर्शन केले.
                 ननसा संचालक डॉ. अजय लाड म्हणाले, नवोपक्रम खरे तर ग्रामीण भागात अधिक होतात. त्यामुळे नवसंशोधन साध्या भाषेत व्हावे, जेणेकरुन ते सर्वांना समजेल, असे सांगून आयोजित केलेल्या उपक्रमांबद्दल त्यांनी माहिती दिली. इन्क्युबेशन सेंटरच्या प्रमुख प्रा. स्वाती शेरेकर यांनी मनोगतातून इन्क्युबेशन सेंटरव्दारे राबविण्यात येत असलेले उपक्रम तसेच नवनवीन नवोपक्रमांबद्दल माहिती दिली.
                 अध्यक्षीय मनोगतातून डॉ. प्रसाद वाडेगावकर यांनी आमचे प्रयत्न योग्य मार्गाने सुरू आहेत असे सांगून  विविध बुट कॅम्प, आविष्कार, प्रदर्शनी अशा उपक्रमांमध्ये विभागाच्या विद्याथ्र्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल माहिती दिली. कार्यक्रमामागील भूमिका श्री आनंद यादव यांनी मांडली. संचालन व आभार अमोल हिरुळकर यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. अनिता पाटील, डॉ. प्रशांत ठाकरे, डॉ. नीरज घनवटे, माजी विद्यार्थी डॉ. संतोष चव्हाण तसेच विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button