डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

नागपूर, दि. 31 डिसेंबर : नागपूर येथील सुप्रसिद्ध मेंदू व मज्जारज्जू शस्त्रक्रिया तज्ञ (न्यूरो सर्जन) डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांच्या निधनाने वैद्यकीय क्षेत्राला मोठा धक्का बसला असून ही घटना अत्यंत दुःखद आणि वेदनादायक असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
मध्य भारतातील वैद्यकीय क्षेत्रात डॉ. पाखमोडे यांनी आपल्या अचूक निदान पद्धती, शस्त्रक्रियेतील उच्च कौशल्य आणि रुग्णांशी जपलेल्या संवेदनशील नात्यामुळे वेगळा विश्वास निर्माण केला होता. नागपूरच्या वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ सेवा देत अत्यंत कठीण आणि गुंतागुंतीच्या हजारो शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडून असंख्य रुग्णांना नवजीवन दिले.
गरीब आणि सर्वसामान्य रुग्णांसाठी ते देवदूतासारखे होते. एक कुशल शल्यविशारद, अत्यंत सुस्वभावी व्यक्तिमत्त्व आणि रुग्णांच्या वेदनांशी आपुलकीने नाते जोडणारा समर्पित तज्ञ व कौटुंबिक मित्र गमावल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे.



