विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील नोंदणीकृत विद्यार्थी संघटनांनी पदाधिका-यांची नावे पाठविण्याचे आवाहन

विद्यापीठात होणार नोंदणीकृत विद्यार्थी संघटनांच्या पदाधिका-यांची सभा
अमरावती (दि.31.12.2025)- विद्याथ्र्यांना येणा-या विविध समस्या लक्षात घेता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रातील नोंदणीकृत विद्यार्थी संघटनेची सभा विद्यापीठात आयोजित होणार आहे. सदर सभेला उपस्थित राहण्याकरिता विद्यापीठ परिक्षेत्रातील नोंदणीकृत विद्यार्थी संघटनेच्या दोन पदाधिका-यांची नावे संपूर्ण पत्त्यासह, मोबाईल क्रमांक व ई-मेलसह संघटनेच्या लेटर हेडवर संचालक, विद्यार्थी विकास विभाग, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती यांचेकडे दिनांक 07 जानेवारी, 2026 पर्यंत पाठविण्याचे आवाहन विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर यांनी केले आहे. तरी नमूद मुदतीत नोंदणीकृत विद्यार्थी संघटनांनी आपल्या पदाधिका-यांची नावे पाठवावे असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे. अधिक माहितीकरिता डॉ. राजीव बोरकर यांचेशी प्रत्यक्ष कार्यालयीन वेळेत संपर्क साधून काही अडचण असल्यास आवश्यक माहिती मिळविता येईल.



