AmravatiEducation NewsLatest News

उन्हाळी २०२५ गुणवत्ता यादीत गो. से. महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्या विद्यार्थिनींचे उज्ज्वल यश

खामगाव:- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ यांच्या उन्हाळी २०२५ परीक्षेची अलीकडेच जाहीर झालेली गुणवत्ता (मेरिट) यादीत गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागातील एम.कॉम.च्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या गुणवत्ता यादीत सुजाता दुरडे हिने ७ वा क्रमांक, तर संजना सिसोदिया हिने ९ वा क्रमांक प्राप्त करून महाविद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेत मानाचा तुरा खोवला आहे.

या यशाबद्दल महाविद्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात दोन्ही विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. सुभाषजी बोबडे, सचिव डॉ. प्रशांतजी बोबडे, प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर तसेच वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे विभागप्रमुख डॉ. डी. एन. व्यास यांच्या हस्ते विद्यार्थिनींना गौरविण्यात आले. या प्रसंगी प्राध्यापकवृंदाने विद्यार्थिनींच्या मेहनतीचे व शिस्तबद्ध अभ्यासाचे कौतुक केले. महाविद्यालयाने विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत सातत्याने स्थान मिळविण्याची परंपरा कायम ठेवली असून ही बाब संस्थेसाठी अभिमानास्पद असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमास वाणिज्य व व्यवस्थापन विभागातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम वाणिज्य अध्ययन मंडळ (कॉमर्स स्टडी सर्कल) च्या विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे आयोजित केला होता. या यशाचे श्रेय विद्यार्थिनींनी महाविद्यालय, मार्गदर्शक प्राध्यापकवृंद आणि पालकांना दिले असून, भविष्यातही अशीच यशस्वी कामगिरी करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी दिली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button