गो. से. महाविद्यालय, खामगाव येथील दोन एनसीसी कॅडेट्सची पीएम रॅली–२०२६ अंतर्गत पुणे ते दिल्ली राष्ट्रीय सायकल मोहिमेसाठी निवड

खामगाव:- विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगावद्वारे संचालित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगावच्या इतिहासात ही निवड अभिमानास्पद व गौरवास्पद मानली जात असून या यशामुळे महाविद्यालयाच्या एनसीसी युनिटची गुणवत्ता पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर अधोरेखित झाली आहे. गो . से. महाविद्यालय, खामगाव येथील एनसीसी युनिटमधील कॅडेट SUO हर्षल किरण पाटील व साक्षी विजय अहिरकर यांची एनसीसी पीएम रॅली 2026 अंतर्गत आयोजित राष्ट्रीय सायकल एक्सपिडेशन ‘शौर्य के कदम, क्रांती की ओर’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेसाठी निवड झाली आहे. गो.से महाविद्यालय खामगाव एनसीसी युनिटचे अधिकारी लेफ्टनंट सुहास पिढेकर यांन पुढे माहिती दिली की ही सायकल मोहीम पुणे ते दिल्ली दरम्यान पार पडणार असून देशभरातील निवडक एनसीसी कॅडेट्स या मोहिमेत सहभागी होणार आहेत. या मोहिमेमध्ये तीन इंची कॅडेट यांचा समावेश होता यामध्ये जय अडेल, हर्षल पाटील आणि साक्षी अहिरकर परंतु मोजक्या जागा असल्या कारणामुळे महाविद्यालयामधील दोनच कॅडेट ची निवड करण्यात आली. एनसीसी संचालनालय, महाराष्ट्र यांच्यामार्फत आयोजित करण्यात येणारी ही सायकल मोहीम 24 डिसेंबर 2025 रोजी पुणे येथून प्रारंभ होणार असून 29 जानेवारी 2026 रोजी दिल्ली येथे समारोप होणार आहे. 13 महाराष्ट्र बटालियन एनसीसी खामगाव चे कमांडिंग ऑफिसर कर्नल ओमेश शुक्ला यांनी पुढे माहिती दिली की मोहिमेचा एकूण प्रवास सुमारे 1680 किलोमीटरचा असून महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तरप्रदेश या राज्यांमधून हा प्रवास करण्यात येणार आहे. ही सायकल मोहीम ही पेशवा बाजीराव प्रथम यांच्या ऐतिहासिक मार्गावर आधारित असून राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, शौर्य, शिस्त व युवकांमध्ये देशसेवेची भावना निर्माण करणे हा मोहिमेचा उद्देश आहे.या मोहिमेदरम्यान ऐतिहासिक व सैनिकी दृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी थांबे देण्यात येणार असून विविध ठिकाणी ऐतिहासिक स्थळे, सैनिकी प्रतिष्ठाने, आर्मी एस्टॅब्लिशमेंट्स यांना भेटी दिल्या जाणार आहेत. तसेच लेफ्टनंट कर्नल आनंद जोशी यांनी सांगितले की ही निवड प्रक्रिया अत्यंत कठीण असून शारीरिक तंदुरुस्ती, सहनशक्ती, सायकलिंग कौशल्य, मानसिक स्थैर्य, शिस्त व नेतृत्वगुण या सर्व निकषांवर कसून चाचणी घेतल्यानंतरच अंतिम निवड करण्यात आले असे यांनी सांगितले. गो से महाविद्यालयाचे, प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर यांनीसांगितले की,“एनसीसीच्या राष्ट्रीय सायकल मोहीम मे साठी हर्षल किरण पाटील व साक्षी विजय अहिरकर यांची निवड ही महाविद्यालयासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकासासोबतच शारीरिक, मानसिक व नैतिक विकास घडतो. त्यांनी दाखवलेली चिकाटी, शिस्त व राष्ट्रभक्ती इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.”संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. सुभाषजी बोबडे यांनी सांगितले की,“राष्ट्रीय पातळीवरील या मोहिमेसाठी निवड होणे हा मोठा सन्मान आहे. या यशामुळे जी. एस. कॉलेज व खामगाव शहराचे नाव देशभरात उज्वल झाले आहे.”संस्थेचे उपाध्यक्ष मा. प्रकाशजी तांबट म्हणाले,“एनसीसीमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्व व सहनशक्ती निर्माण होते. या निवडीमुळे युवकांमध्ये राष्ट्रसेवेची प्रेरणा वाढेल.”संस्थेचे सचिव डॉ. प्रशांतजी बोबडे यांनी सांगितले की,“विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था नेहमीच प्रयत्नशील आहे. या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची प्रेरणा मिळेल. ”या यशाबद्दल बटालियन आर्मी स्टाफ सुभेदार मेजर दिनेशकुमार, सुभेदार सचिन बोधे, सुभेदार अशोक येवले व सुभेदार नागोसिंग राठोड, श्री श्याम जामोदे तसेच जी. एस. कॉलेज, खामगावचे सर्व प्राध्यापक व कर्मचारी वृंद व ncc कॅडेट यांनीही हर्षल किरण पाटील व साक्षी विजय अहिरकर यांचे आई वडील या राष्ट्रीय स्तरावरील निवडीबद्दल समाधान व्यक्त करत त्यांना पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी दिली आहे.



