गो. से. महाविद्यालयात विद्यार्थी विकास व सांस्कृतिक समिती तसेच विद्यार्थी परिषद ची सभा सपन्न

खामगाव :- विदर्भ शिक्षण प्रसारक मंङळ व्दारा संचालीत गो से विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय मध्ये दी 20/12/2025 रोजी प्राचार्य डॉ. ङी. एस. तळवणकर याच्या अध्यक्षेखाली विद्यार्थी विकास व सांस्कृतिक समिती तसेच विद्यार्थी परिषदेची सभा संपन्न झाली . सभेमध्ये शैक्षणिक सत्र 2025-2026 मध्ये महाविद्यालयीन गणवेश बदल करण्याबाबत विस्तृत चर्चा होवून पुढील वर्षापासून महाविद्यालयातील विद्यार्थी ना नवीन गणवेश राहील असे ठरविण्यात आले. तसेच वाषिर्क दिनाचे आयोजन फेब्रुवारी च्या पहिल्या आठवड्यात घेण्याचे विद्यार्थी प्रतिनीधी माफॅत ठरविण्यात आले. तसेच दि 22/12/2025 रोजी राष्ट्रीय गणित दिवसानिमीत करिअर कट्टा माफॅत AWS Carrier बाबत माहीती देण्यात आली . सभेचे सूत्रसंचालन विद्याथी विकास समिती चे समन्वयक डॉ. जे. ङी. पोरे यांनी केले. सभेला डॉ. एन बी बोचे, प्रा सुहास पिढेकर, डॉ. बी. एम. टकले, प्रा. कोमल कामे, प्रा. ए. एल. शिंदे, प्रा. यु.जी. खंदारे, डॉ. एच. ए. भोसले तसेच विद्यार्थी परिषद अध्यक्ष कु. श्रृती आटोळे, सचिव कु. सई पंकज मोहीते, सहसचिव कु. श्रेया प्रमोद पेटकर, कोषाध्यक्ष विशाल कचरे, सदस्य कु सोनल ठाकरे , आदित्य पाटील, अमेय खंङेतोङ, कु गंगा भुसारी उपस्थित होते. सभेचे आभार प्रदर्शन. बि. एम. टकले सर यांनी केले. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी दिली आहे.



