AmravatiLatest News
अमरावतीत एमआयएमच्या चक्काजाम आंदोलनाला यश – महानगरपालिकेकडून 33 केव्ही सब-स्टेशनसाठी तयारी

अमरावती | प्रतिनिधी
अमरावतीत एमआयएमच्या चक्काजाम आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. १० डिसेंबर रोजी ट्रान्सपोर्ट नगर परिसरात घेतलेल्या या आंदोलनादरम्यान, एमआयएमने पश्चिम मुस्लिम बहुल भागातील कंपोस्ट डेपो हटविणे आणि मिनी पावर हाऊस प्लांट/33 केव्ही सब स्टेशन उभारण्याची मागणी केली होती.
पूर्वी आयुक्तांकडे पाठपुराव्याला प्रतिसाद न मिळाल्यामुळे एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून भव्य चक्काजाम आंदोलन केले. सात दिवसांच्या अल्टिमेटमनंतर अखेर महानगरपालिकेने 33 केव्ही सब-स्टेशन उभारणीसाठी तयारी दर्शविली आहे.
अमरावतीत पत्रकार परिषदेत एमआयएमकडून ही अधिकृत माहिती देण्यात आली. पक्षाने यशस्वी आंदोलनामुळे नागरिकांना व क्षेत्रीय विकासाला फायदा होईल असे म्हटले आहे.



