अमरावती महापालिका निवडणूक लवकरच? 2017 मधील प्रभाग क्रमांक 1 — शेगाव–रहाटगावचा इतिहास

अमरावती: अमरावती महानगरपालिका निवडणुकीची घोषणा येत्या काही दिवसांत होण्याची शक्यता असल्याचे संकेत मिळत आहेत. महापालिकेची शेवटची निवडणूक 2017 मध्ये झाली होती आणि कार्यकाळ 2022 मध्ये संपल्यानंतरही अद्याप नवी निवडणूक झालेली नाही. त्यामुळे सध्या संपूर्ण महानगरपालिकेवर प्रशासनराज चालू असून, नागरिक आणि राजकीय पक्ष निवडणुकीची घोषणाकडे उत्सुकतेने पाहत आहेत.
या पार्श्वभूमीवर, 2017 मधील प्रभाग क्रमांक 1 – शेगाव–रहाटगाव प्रभागाचा इतिहास पाहूया.
2017 निवडणूक: प्रभाग संरचना व क्षेत्र
प्रभाग क्रमांक 1 मध्ये 4 नगरसेवकांची निवड करण्यात आली होती. या प्रभागात समाविष्ट प्रमुख क्षेत्रे:
- शेगाव, रहाटगाव
- मराठा नगर, माधवनगर
- गुहे लेआउट, श्रीराम नगर
- शिंगोरे कॉलनी, सच्चिदानंद कॉलनी
- अर्जुन नगर, पावर हाऊस
- संगीता कॉलनी, अनगड नगर
- पद्मस्वरब कॉलनी, अयोध्या कॉलनी
- तारांगण नगर, एशियाड कॉलनी
- पुष्पगंधा कॉलनी, हॉलीवूड कॉलनी
- स्वावलंबी नगर, कॉटन ग्रीन कॉलनी
- विश्व प्रभा कॉलनी, शांतीसदन, विजय कॉलनी
- शासकीय अभियांत्रिकी परिसर
या प्रभागाची एकूण लोकसंख्या 27,457 इतकी नोंदली गेली होती.
2017 ची निवडणूक: उमेदवारी व मतदारसंघांचे वर्ग
या प्रभागात अ, ब, क, ड अशा चार वर्गांमध्ये निवडणूक घेण्यात आली. एकूण 36 उमेदवार रिंगणात होते:
- अ वर्ग – 10 उमेदवार
- ब वर्ग – 4 उमेदवार
- क वर्ग – 7 उमेदवार
- ड वर्ग – 15 उमेदवार
2017 चे निकाल: चारही जागांवर भाजपचा विजय
अ वर्ग
- विजयी: विजय लक्ष्मणराव वानखेडे – 4051 मते
- पराभूत: राजू शामराव मानकर (शिवसेना) – 1136 मतांनी पराभव
ब वर्ग
- विजयी: सुशीला शेखर बिरे – 5433 मते
- पराभूत: अर्चना रवींद्र इंगोले (काँग्रेस) – 1419 मतांनी पराभव
क वर्ग
- विजयी: वंदना प्रदीप मडगे – 4077 मते
- पराभूत: रूपाली प्रशांत धर्माळे (काँग्रेस) – 737 मतांनी पराभव
ड वर्ग
- विजयी: गोपाल दामोदर धर्माळे – 2757 मते
- पराभूत: दीपक नामदेवराव लोखंडे (काँग्रेस) – 186 मतांनी पराभव
चारही विजयी उमेदवार भारतीय जनता पक्षाचे होते. 2017 मधील ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाल्याची नोंद आहे.
2025 निवडणूक: कोण उतरणार रिंगणात?
2017 मधील विजयी चेहरे पुन्हा मैदानात उतरणार का? नवीन राजकीय समीकरणे निर्माण होतील का?
अमरावतीतील नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये या निवडणुकीबाबतची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे.



