डॉ बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची श्री दादासाहेब गवई स्मारकाला शैक्षणिक भेट

अमरावती : स्थानिक फ्रेजरपुरा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच येथील मार्डी रोडवरील श्री रा.सु. (श्री दादासाहेब) गवई यांच्या स्मारकाला शैक्षणिक भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी श्री दादासाहेब गवई स्मृती भवनात असलेल्या डिजिटल पोस्टरव्दारे दादासाहेबांच्या जीवनचरित्राविषयी माहिती घेतली. तसेच त्यांनी संसद आणि विविध ठिकाणी दिलेली भाषणे श्रवणयंत्राने ऐकली त्याचबरोबर उपस्थित शिक्षकांनी सुध्दा श्री दादासाहेब गवई यांच्या समाजजीवनासाठी केलेल्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
सर्व विद्यार्थ्यांनी दादासाहेबांच्या विचारकार्याला पुढे नेवू असे विचार व्यक्त केले. यावेळी स्मारकाचे संपदा व्यवस्थापक श्री धम्मदीप गवई, विद्यालयाचे मुख्याध्यापक विद्यार्थी, श्री प्रविण घोंगडे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका आशा खरबडे,स्वप्निल गवई, देवानंद शेंडे, भारती अटाळकर, अनिकेत माथने, आकाशी सर्वटकर, पवन गावंडे,अमोल उमाळे, सचिन सोळंके, राठोड सर, मंदा कुबडे स्मारकाचे पर्यवेक्षक श्री अजिंक्य ढोले व आदी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



