AmravatiLatest NewsSports

पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ टेबल टेनिस (पुरुष व महिला) स्पर्धेकरिता विद्यापीठाचे संघ घोषित

अमरावती : महात्मा ज्योतिराव फुले विद्यापीठ, जयपूर येथे (पुरुष संघ) व वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठ, सुरत येथे (महिला संघ) 15 ते 19 डिसेंबर, 2025 दरम्यान होणा-या पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ टेबल टेनिस स्पर्धेकरिता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे संघ घोषित करण्यात आले आहे.
पुरुष संघ
चमूंमध्ये विद्याभारती महाविद्यालय, अमरावतीचा आदर्श कदम व रियान शाह, एस.एस.जी.एम.सी.ई. शेगांवचा उज्ज्वल शर्मा, एस.एस.के.आर.आय. महाविद्यालय, कारंजा लाडचा प्रितेश मर्दाने, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीचा अथर्व वेंगणकर व फुरबा शेरपा, डॉ. राजंेद्र गोडे इन्स्टिट¬ुट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड रिसर्च, अमरावतीचा क्रिष्णा महल्ले याचा समावेश आहे.
महिला संघ
महिला चमंूमध्ये एल.आर.टी. वाणिज्य महाविद्यालय, अकोलाची कु. कस्तुरी ठोसर, शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावतीची कु. साक्षी इंगळे, श्री व्यंकटेश महाविद्यालय, देऊळगांव राजाची कु. मोनिका सावडे, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावतीची कु. परिधी जयस्वाल, श्री आर.एल.टी. विज्ञान महविद्यालय, अकोलाची कु. पायल गावंडे व कु. फाल्गुनी सैतवाल, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीची कु. नर्सिग इस्लाम हिचा समावेश आहे.
              निवड झालेल्या सर्व संघाच्या चमूंचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे. पुरुष व महिला संघाचा प्रशिक्षण वर्ग विद्याभारती  महाविद्यालय, अमरावती येथे दि. 10 ते 12 डिसेंबर दरम्यान होणार असून प्रशिक्षण वर्गाला सर्व खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी त्यांचेशी संपर्क साधता येईल.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button