Latest News

झारखंडच्या कोडरमा जिल्ह्यात शाळेची बस उलटली; ३१ विद्यार्थीनी जखमी

झारखंडच्या कोडरमा जिल्ह्यात शनिवारी किमान ३१ विद्यार्थीनी जखमी झाल्या, कारण त्यांच्या शाळेची बस उलटून २५ फूट खोल दरीत कोसळली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

ही दुर्घटना रांची–पटना मुख्य रस्त्यावर, कोडरमा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कोडरमा व्हॅली परिसरात घडली. पुटो, चंदवारा येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थिनींना घेऊन जाणारी बस अचानक नियंत्रण सुटल्यामुळे उलटली आणि दरीत पडली, अशी प्राथमिक माहिती आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिस व स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. जखमी विद्यार्थिनींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.

दुर्घटनेचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button