Latest NewsMaharashtra

गळफास घेऊन तरुणीची आत्महत्या

राठी नगर परिसरात राहणाऱ्या १८ वर्षीय तरुणीने किरायाच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवार रात्री नऊच्या सुमारास उघडकीस आली.
ईशा कुंजन आडे (वय १८, रा. देवगाव) असे मृत तरुणीचे नाव आहे. ती तिच्या आई व मोठ्या बहिणीसोबत राठी नगर येथील किरायाच्या घरात राहत होती. बारावी कॉलेजमध्ये डमी प्रवेश घेतलेल्या ईशा एका खाजगी कोचिंग क्लासला जात असे.

काही दिवसांपूर्वी नागपूर येथे ईशाच्या मावशीचे ऑपरेशन झाल्याने तिची आई आणि दोन्ही बहिणी मावशीला भेटण्यासाठी चार दिवसांपूर्वी गेलेल्या. मात्र विषयाचे ट्युशन असल्याने ईशा दोन दिवसांनी एकटीच परत आली. त्या वेळपासून तिच्याशी संपर्क साधण्याचा आईचा प्रयत्न चालू होता; परंतु ईशा फोन उचलत नव्हती.

गुरुवारी सायंकाळी मोठी बहीण परत रूमवर आली असता तिने दरवाजा ठोठावला, परंतु दरवाजा आतून उघडण्यात आला नाही. शंका आल्याने तिने खिडकीतून आत डोकावून पाहिले असता ईशा ओडणीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. तिने तत्काळ घरमालकांना माहिती दिली.

घरमालकांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडून पाहिले असता ईशा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतावस्थेत आढळली. घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून तो ग्रामीण रुग्णालय, धामणगाव रेल्वे येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास दत्तापूर पोलीस करीत आहेत.
सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button