Accident NewsLatest NewsMaharashtra
महामार्गावर एसटी बस आणि मोटरसायकलचा भीषण अपघात

औसा ते निलंगा या महामार्गावर चलबुर्गा पाटीजवळ घडलेला हा अपघात अगदी काही क्षणांचा होता. सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या फुटेजनुसार मोटरसायकलवरून येणारे दांपत्य आपल्या दिशेने सावकाश जात होते, मात्र समोरून वेगात येणारी एसटी बस नियंत्रण सुटल्याने थेट मोटरसायकलवर आदळली. धडकेत दोघे काही अंतरावर फेकले गेले. अपघात एवढा जबरदस्त होता की मोटरसायकलचे पुढचे भाग पूर्णतः तुकडे तुकडे झाले.
घटनास्थळी नागरिकांनी तत्काळ बचावकार्य सुरु केले. अपघातग्रस्त पती-पत्नींना लातूरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले असून दोघेही गंभीर जखमी आहेत. या अपघातानंतर स्थानिकांमध्ये एसटी बसचालकांच्या बेफिकिरीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज जप्त केले असून, अपघाताच्या कारणाचा सखोल तपास सुरु आहे.



