Latest NewsMaharashtra

आ. रवी राणा यांच्या निधीतून साकारते पहिली अत्याधुनिक अभ्यासिका

बडनेरा – बडनेरा येथील नविवस्ती परिसरातील आठवडी बाजारात अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला ‘अत्याधुनिक अभ्यासिका केंद्र’ प्रस्ताव अखेर साकाराच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे. भारतीय बौद्ध महासभा बडनेरा शाखेच्या वतीने सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला आमदार रवी राणा यांनी आमदार स्थानिक विकास निधीतून मंजुरी दिली असून, छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या नावाने अभ्यासिकेच्या इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष मच्छिंद्र भटकर यांच्या हस्ते नारळ फोडून कामाची सुरुवात करण्यात आली. तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीचे अध्यक्ष मनोज गजभिये, ज्येष्ठ अभियंता विलास साखरे यांच्या हस्ते पूजा व भूमिपूजन झाले.
या प्रसंगी युवा स्वाभिमानी संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक सुनील राणा, शहराध्यक्ष अजय जयस्वाल उपस्थित होते. सुनील राणा यांनी या उपक्रमासाठी निधी कमी पडल्यास आमदार रवी राणा यांच्या माध्यमातून अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभेचे सदस्यांसह मान्यवरांची उपस्थिती होती. इंजी. विलास साखरे यांनी जागेचे मोजमाप करून लेआऊट तयार केला. या उपक्रमात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष तथा महासभेचे मार्गदर्शक मनोज गजभिये यांनी मोलाची भूमिका निभावली. प्रशासकीय सोपस्कार पूर्ण झाल्याने आता बांधकामाची गती वाढवून विद्यार्थ्यांसाठी हे आधुनिक शिक्षण केंद्र लवकरच खुले व्हावे अशी स्थानिक नागरिकांची अपेक्षा आहे.”

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button