citynewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

नागपुरात १.५९ लाखांचा प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त; १९ वर्षीय तरुणाविरुद्ध कारवाई

अंबाझरी पोलिसांची धडक कारवाई; विक्रीच्या उद्देशाने साठवलेले मांजाचे ५३ नग हस्तगत

नागपूर : पतंग उडविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या विक्रीविरोधात नागपूर पोलिसांनी कारवाई केली आहे. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंकरनगर चौक परिसरात छापा टाकून पोलिसांनी १ लाख ५९ हजार रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त केला. या प्रकरणी १९ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ नोव्हेंबर रोजी दुपारी २.१० ते ३ वाजेदरम्यान अंबाझरी परिसरात ही कारवाई करण्यात आली. विजय अपार्टमेंट, फ्लॅट क्रमांक ३०३, शंकरनगर चौक, अंबाझरी रोड येथील एका ठिकाणी प्रतिबंधित नायलॉन मांजाचा साठा असल्याची गोपनीय माहिती AHTU व SSB पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंच आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने सापळा रचला.

यावेळी अधीशराज वीरेंद्र झा (वय १९, रा. विजय अपार्टमेंट, शंकरनगर चौक) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे शासनाने प्रतिबंधित केलेल्या मोनो काईट नायलॉन मांजाचे ५३ नग आढळून आले. हा साठा विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या बाळगल्याचा आरोप असून, पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. जप्त मांजाची किंमत १ लाख ५९ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ मधील कलम ५ व १५ तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी आरोपीला अंबाझरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई AHTU व SSB पथकाने केली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button