भाजपाच्या पदयात्रेसाठी नागपूर पोलिसांचा सुरक्षा आराखडा; पोलीस आयुक्तांकडून मार्गाची पाहणी

५ नोव्हेंबरला सायंकाळी ४ वाजता यशवंत स्टेडियममधून पदयात्रेला सुरुवात; वाहतूक नियंत्रण आणि पोलीस बंदोबस्ताचा घेतला आढावा
नागपूर : भाजपाच्या प्रस्तावित पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलीस प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेची तयारी सुरू केली आहे. पदयात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच वाहतुकीचे नियोजन सुरळीत व्हावे, यासाठी पोलीस आयुक्तांनी ईश्वर देशमुख स्टेडियमसह संबंधित मार्गांची पाहणी केली.

या दौऱ्यात पदयात्रेचा मार्ग, प्रमुख चौक-चौरस्त्यांवरील पोलीस तैनाती, वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. गर्दीच्या ठिकाणी संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन बंदोबस्ताचे नियोजन करण्याच्या दृष्टीनेही पाहणी करण्यात आली.
भाजपाची ही पदयात्रा ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता यशवंत स्टेडियम येथून सुरू होणार आहे. तेथून पदयात्रा गोवारी टी-पॉइंट आणि मॉरिस कॉलेज चौकाच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित मार्गांवर पोलीस बंदोबस्त आणि वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यात येत आहे.



