AMCActionAmravaticitynews

मालमत्ता कर थकविणाऱ्यांना मनपाचा दणका; तीन मालमत्ता केल्या सील!

एमआयडीसी औद्योगिक परिसरातील दोन उद्योगांसह त्रिवेणी कॉलनीतील मालमत्तेवर कारवाई; ७ लाख ५५ हजारांची थकबाकी

अमरावती : मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी अमरावती महानगरपालिकेने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. कराचा भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या थकबाकीदारांविरुद्ध धडक मोहीम राबवत मनपाच्या पूर्व झोन क्रमांक ३, दस्तूरनगर विभागाने तीन मालमत्ता सील केल्या. ३ नोव्हेंबर २०२६ रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत एकूण ७ लाख ५५ हजार ६९ रुपये मालमत्ता कर थकीत असल्याचे समोर आले आहे.

मनपा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, वॉर्ड क्रमांक C8 मधील एमआयडीसी औद्योगिक परिसरात ही कारवाई करण्यात आली. येथील मालमत्ता क्रमांक १९५८ असलेल्या त्रिमूर्ती ऑइल इंडस्ट्रीजकडे ४ लाख २१ हजार ९४५ रुपये मालमत्ता कर थकीत होता. तर मालमत्ता क्रमांक १९५९ असलेल्या शिव दाल ऑइल इंडस्ट्रीजकडे २ लाख ३१ हजार ८०१ रुपयांची थकबाकी होती. वारंवार सूचना देऊनही थकीत कराचा भरणा न झाल्याने प्रशासनाने जप्तीनाम्यानुसार दोन्ही मालमत्ता सील केल्या.

यासोबतच वॉर्ड क्रमांक C1 मधील त्रिवेणी कॉलनी येथेही मनपाने कारवाई केली. मालमत्ता क्रमांक ३११६ असलेल्या अमरावती जिल्हा दूध उत्पादक सहकारी संस्थेकडे १ लाख १ हजार ३२३ रुपये मालमत्ता कर थकीत होता. संबंधित संस्थेकडूनही कराचा भरणा न झाल्याने ही मालमत्ता सील करण्यात आली.

या तिन्ही मालमत्तांची एकत्रित थकबाकी ७ लाख ५५ हजार ६९ रुपये असून, मनपाच्या वसुली मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. झोन क्रमांक ३ चे सहाय्यक आयुक्त नितीन बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी सहाय्यक क्षेत्रीय अधिकारी प्रवीण ठाकरे, दीपक सरसे, श्रीकृष्ण ढगे, आकाश चौधरी, वसुली लिपिक विनोद स्वर्गी, महबूब मांजरे आणि सिद्धांत गाडे उपस्थित होते.

दरम्यान, मालमत्ता कर हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असून, शहरातील विकासकामे आणि नागरी सुविधांसाठी त्याची नियमित वसुली आवश्यक आहे. त्यामुळे सर्व थकबाकीदार मालमत्ताधारकांनी तातडीने कराचा भरणा करावा. अन्यथा नियमानुसार जप्ती आणि मालमत्ता सील करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा महानगरपालिका प्रशासनाने दिला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button