Crime NewsLatest NewsMaharashtra

बडनेरात बोलेरोतून 10 लाखांचा गुटख्यासह आरोपी ताब्यात

06 ऑक्टोबर 2025 रोजी बडनेरा पोलिसांना खात्रीलायक माहिती मिळाली की, बोलेरो पिकअप वाहनात महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला गुटखा अवैधरित्या वाहतूक करण्यात येत आहे. ही माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ सापळा रचून वाहनाला अडवलं. तपासादरम्यान बोलेरो पिकअप वाहनात मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू मिश्रीत सुपारी (गुटखा) सापडला. सदर वाहनातील इसमाची चौकशी केल्यावर त्याचे नाव अफसर खान मिया खान (वय 50, रा. कमेला ग्राउंड, नागपुरी गेट, अमरावती) असे समोर आले. अफसर खानला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने सांगितले की हा माल अमीन शेख, रा. बडनेरा याचा आहे. या कारवाईत पोलिसांनी बोलेरो पिकअप वाहनासह एकूण 10 लाख 7 हजार 206 रुपयांचा माल जप्त केला आहे.
सदर माल व वाहन जप्त करून बडनेरा पोलिसांनी अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गुटख्याची अवैध वाहतूक आणि विक्री थांबवण्यासाठी पोलिसांची ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. राज्यातील गुटखा माफियांविरोधात ही मोहीम सुरूच राहणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button