AmravatiLatest NewsSports

अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मल्लखांब (पुरुष) व रोप मल्लखांब (महिला) स्पर्धेकरिता विद्यापीठाचा संघ घोषित

अमरावती – (दि. 04/10/2025)
                 विनायका मिशन्स रिसर्च फाऊंडेशन, सालेम (तामिळनाडू) येथे 24 ते 27 ऑक्टोबर, 2025 दरम्यान होणा-या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मल्लाखांब (पुरुष) व रोप मल्लखांब (महिला) स्पर्धेकरिता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा संघ घोषित करण्यात आला असून, चमूंचा प्रशिक्षण वर्ग दि. 9 ते 18 ऑक्टोबर, 2025 दरम्यान डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती येथे होणार आहे.
पुरुष संघ (मल्लखांब)
पुरुष चमूंमध्ये डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीचा वरूण साहु, हिमांशू राठोड, वृषभ धोटे व यश हिरेखन, डॉ. राजेंद्र गोडे इन्स्टिट¬ुट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड रिसर्च, अमरावतीचा रोहित मेहरे, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीचा तन्मय बिजागिरे यांचा समावेश आहे.
महिला संघ (रोप मल्लखांब)
महिला चमूंमध्ये प्रो. राम मेघे इन्स्टिट¬ुट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड रिसर्च, बडनेराची कु. मधुरा भिडाने, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीची कु. अनुश्री सिंघई, कु. मुग्धा भिडाने व कु. पूजा ठाकरे, श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावतीची कु. नेहा दारसिंबे, कु.निलाक्षी दारसिंबे व कु. भाग्यश्री जामुनकर, इंदिरा महाविद्यालय, कळंबची कु. उन्नती अतकर हिचा समावेश आहे. निवड झालेल्या सर्व चमूंचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे. प्रशिक्षण वर्गाला सर्व खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button