AmravatiLatest NewsSports

पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ कबड्डी स्पर्धेकरिता विद्यापीठाचा संघ घोषित

अमरावती – (दि. 24/09/2025)
                 मेडिकॅप्स युनिव्र्हसिटी, इंदौर येथे 1 ते 5 ऑक्टोबर, 2025 दरम्यान होणा-या पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ कबड्डी (पुरुष) स्पर्धेकरिता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा संघ घोषित करण्यात आला असून, चमूंचा प्रशिक्षण वर्ग दि. 25 ते 29 सप्टेंबर, 2025 दरम्यान डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती येथे होणार आहे.
                 चमूंमध्ये श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावतीचा प्रयाग अढाऊ, श्रीकांत राऊत, संत गाडगे महाराज महाविद्यालय, वलगांवचा ओम भाकरे, श्री धाबेकर कला महाविद्यालय, खडकी, अकोलाचा अर्जून तंवर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, अमरावतीचा शिवम खोपडकर, जी.एस.महाविद्यालय, खामगांवचा गणेश मुनोत, स्व. दत्तात्रय पुसदकर महाविद्यालय, नांदगांव पेठचा वेदांत भटकर, महात्मा फुले महाविद्यालय, पातुरचा निखिल येऊतकर, जय बजरण महाविद्यालय, चान्नीचा सुमित चोपडे, इंदिरा गांधी महाविद्यालय, राळेगांवचा सुमित सातघरे, श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावतीचा भरत अहिर व तनिष नांदणे, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीचा आशुतोष किटुकले, बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय, पांढरकवडाचा यश चौहाण, बी.बी. आर्ट, एन.बी. कॉमर्स अॅन्ड बी.पी. सायन्स कॉलेज, दिग्रसचा कार्तिक राठोड, ब्राजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीचा श्रावण आंबेकर आणि आर.जी. राठोड महाविद्यालय, मूर्तिजापूरचा अनुराग आटोटे यांचा समावेश आहे. निवड झालेल्या सर्व चमूंचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे. प्रशिक्षण वर्गाला सर्व खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button