जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त विद्यापीठात कार्यशाळा संपन्न

मानसशास्त्र विभाग, इंदिराबाई महिला महाविद्याल व विद्याभारती महाविद्यालयाचे संयुक्त आयोजन
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील मानसशास्त्र विभाग, इंदिराबाई महिला महाविद्यालय आणि विद्याभारती महाविद्यालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्य आत्महत्येची कारणे, समस्या व परिणाम याबाबत जागरूकता निर्माण करणे, आत्महत्येपासून बचाव करण्यासाठी आवश्यक मदत, मानसिक आधार यासंदर्भात मार्गदर्शन तसेच मानसिक आरोग्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे या दृष्टिकोनातून विद्याथ्र्यांकरिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी विभागाच्या समन्वयक प्रा. अरुणा तसरे, प्रमुख वक्ते म्हणून अमरावती शहरातील मानस हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉ. पंकज वसाडकर, इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय कोल्हे, विद्याभारती महाविद्यालयाचे प्रा. डॉ. शंकर वाकोडे उपस्थित होते.
हल्लीच्या काळात समाजात आत्महत्येचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे आणि या समस्येतून बाहेर काढण्यासाठी समुपदेशनाची अत्यंत गरज असून भविष्यात या विभागातून समुपदेशक निर्माण होण्यास मदत होईल. नागरिकांचे मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी यामुळे निश्चितच मदत होईल, असे डॉ. पंकज वसाडकर यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले. प्राचार्य डॉ. अजय कोल्हे म्हणाले, मानसशास्त्राचा सखोल अभ्यास करून समाजातील विविध मानसिक आजारग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी विद्याथ्र्यांनी उपाययोजना केली पाहिजे. याप्रसंगी डॉ. शंकर वाकोडे यांच्या हस्ते मानसशास्त्र अभ्यास मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. ‘मानसशास्त्र विषयाचे महत्त्व आणि अभ्यास मंडळाची गरज’ यावर डॉ. वाकोडे यांनी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन कु. अनुजा पत्रे, तर आभार कु. गौरी बुरंगे हिने मानले. डॉ. श्रध्दा हरकंचे, प्रा. द्विग्विजय कडू, प्रा. अभिजित खंडारे, प्रा. ऋतुजा ठाकरे यांनी कार्यशाळेचे यशस्वीरित्या आयोजन केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी श्री राजू इंगोले यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी मानसशास्त्र विभाग, इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालय तसेच विद्याभारती महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.



