AmravatiLatest News

गो. से. महाविद्यालयात ‘संशोधन पद्धती कार्यशाळेला’ उत्स्फूर्त प्रतिसाद

खामगाव : स्थानिक गो.से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव येथे स्व. शंकररावजी उपाख्य ॲड भाऊसाहेब बोबडे स्मृती सप्ताह निमित्य महाविद्यालयाच्या संशोधन सल्लागार समिती द्वारे दिनांक २२ व २३ सप्टेंबर २०२५ रोजी विद्यापीठस्तरीय दोन दिवसीय संशोधन कार्यशाळे करिता विविध महाविद्यालयातून सुमारे २४० संशोधक विद्यार्थी- विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. आजच्या उद्घाटन पर कार्यक्रमाकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी.एस.तळवणकर अध्यक्षस्थानी तर विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य डॉ नंदकिशोर महाले, महाविद्यालयाचे उपप्राचार्य. डॉ पी.व्ही. उबाळे, कार्यशाळेचे समन्वयक तथा प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ जी.बी.काळे, कार्यशाळेचे सचिव तथा रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ हेमंत कुमार चांडक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ जी.बी.काळे यांनी सांगितले की, स्व. भाऊसाहेबांना संशोधनामध्ये विशेष रुची होती. मग ते महाविद्यालयाचा परिसर असो किंवा येथील प्राध्यापकांनी मिळवलेली आचार्य पदवी असो, या सर्वांवर त्यांच कटाक्षाने लक्ष असायच. आज संपन्न होत असलेल्या संशोधन कार्यशाळेला अनन्यसाधारण महत्व आहे . त्यामुळे संशोधकांना नवीन ज्ञान आणि कल्पना शोधण्यास, समस्यांचे निराकरण करण्यास आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यास मिळणार. या कार्यशाळेमधून प्रभावी संशोधन तयार करणे, त्याचे विश्लेषण करणे आणि ते उच्च-गुणवत्तेच्या जर्नल्समध्ये प्रकाशित कसे करावे याबद्दल सुद्धा मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच,  संशोधकांमध्ये सहकार्य आणि भागीदारी वाढते, ज्यामुळे देशाच्या विकासाला  गती मिळण्याकरिता निश्चित हातभार लागू शकतो. असेही त्यांनी पुढे सांगितले. एकूण आठ भागांमध्ये संपन्न होत असलेल्या दोन दिवसीय कार्यशाळेचे प्रथम पुष्प रसायनशास्त्राच्या प्रा. डॉ कु. रोहिणी धरमकर यांनी ‘ओरिजिन अँड कन्सेप्ट ऑफ रिसर्च’ ओघवत्या शैलीमध्ये आणि सोप्या भाषेमध्ये विद्यार्थ्यांसमोर सादर केले. जेव्हा आपण संशोधन करू असे मनाशी ठरवतो तेव्हा ते संशोधन कोणत्या प्रकारे पूर्णत्वास न्यायचे? त्यांनी उत्तम प्रकारे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. द्वितीय पुष्प गुंफतांना डॉ हेमंतकुमार चांडक यांनी ‘लिटरेचर सर्वे अँड प्रपोजल रायटिंग’या विषयावर सादरीकरण आपल्या उत्तम शैलीमध्ये तसेच सफाईदार उदाहरणे देऊन केले.आपण एखाद्या प्रकल्प संशोधनाची पूर्वतयारी करिता उपलब्ध असलेले संसाधने आणि त्या संसाधनांचा वापर कसा करायचा ?यावर प्रकाश टाकत संशोधकांना मंत्रमुग्ध केले. तदनंतर रसायनशास्त्रातील संशोधक विद्यार्थी प्रा.निकेश धुर्वे आणि प्रा.मो.तनवीर यांनी ‘मेंडले आणि रेफरन्सिंग’ वापरताना कोणती तयारी करायची आणि आपल्या प्रबंध किंवा प्रकल्प प्रस्तावामध्ये कुठल्या प्रकारचं सायटेशन घ्यायचं, त्याची मांडणी आणि अचूकता कशी राखायची यावर प्रकाश टाकला. आजच्या प्रथम दिवसाचे अंतिम सत्रातील चौथे पुष्प ‘इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राइट्स’ या विषयावर भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ संजय हरगुणांनी यांनी गुंफले. त्यांनी  आपल्या दैनंदिन व्यवहारातील विविध उदाहरणे देत आयपीआर बद्दलची अद्यावत माहिती देऊन मार्गदर्शन केले. त्यामध्ये आयपीआर म्हणजे काय ,ट्रेडमार्क, कॉपीराईट , पेटंट म्हणजे काय ?आणि पेटंटचे फायदे आणि तोटे यावर सुद्धा अनेक सोपे उदाहरणे देऊन संशोधक विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती दिली. कार्यशाळे करिता लाभलेले विशेष अतिथी डॉ नंदकिशोर महाले यांनी संयोजकांचे कौतुक करीत आजची संशोधन पद्धती कार्यशाळा अनेक विषयांवर सांगोपांग चर्चा करणारी आहे. संशोधन कार्यशाळे करिता विविध विषयांची निवड म्हणजे विद्यार्थ्यांच्या बुद्धीला एक वेगळा आयाम मिळणार यात शंकाच नाही. तदनंतर आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य डॉ डी. एस.तळवणकर ,उपप्राचार्य डॉ पी.व्ही. उबाळे यांनी सांगितले की, संशोधन स्तरावर आमचे महाविद्यालय अग्रेसर आहे. आमचे सर्वच प्राध्यापक विद्याविभूषित असून जवळपास सर्वच आचार्य मार्गदर्शक आपल्याला संशोधन कार्यामध्ये वाहून घेतले आहे. आमचे महाविद्यालय केवळ संशोधक विद्यार्थी घडत घडवीत नाही तर संशोधनाला विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्याकरिता प्रयत्नशील असतात. दोन दिवस चालणाऱ्या या संशोधन कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये समीक्षणात्मक विचारसरणी तसेच विश्लेषणात्मक कौशल्य विकसित होण्याकरिता निश्चित मदत होईल याची मला खात्री आहे. सदर कार्यशाळेच्या यशस्वीतेकरिता कार्यशाळा समन्वयक डॉ जी.बी. काळे, कार्यशाळेचे सचिव डॉ.हेमंतकुमार चांडक, कार्यशाळेचे सदस्य तथा अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ राजेंद्रकुमार गव्हाळे, डॉ जे.डी.पोरे, डॉ अरविंद तायडे, डॉ पृथ्वीराज सिंह ठाकूर, प्रा मनोज बाबळे,प्रा मयूर नप्ते तसेच कर्मचारी बंधूंमध्ये सर्वश्री माणिक थाटे ,अशोक चव्हाण, विठ्ठल चंदनकार, अमोल बोधनकार आदींनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा मयूर नप्ते ,प्रा मनोज बाभळे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. चांडक यांनी केले. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी दिली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button