AmravatiMaharashtra

अमरावती कॅम्प परिसरातील रस्ता खड्डेमय, नागरिक संतप्त

अमरावती – अमरावती महानगरपालिकेच्या क्षेत्रात कॅम्प एरिया हा सर्वात जास्त कर भरणारा विभाग मानला जातो. येथील व्यापारी, उद्योजक, बँका, हॉस्पिटल्स, इंडियन मेडिकल असोसिएशन हॉल… असे अनेक महत्त्वाचे ठिकाणे या भागात आहेत. मात्र अभिनंदन को-ऑपरेटिव्ह बँक ते कॅम्प रोडपर्यंतचा मार्ग गेल्या महिनाभरापासून अक्षरशः खड्ड्यांनी पोखरला आहे. या मार्गावरून दररोज शेकडो वाहने धावत असतात. ज्ञानमाता शाळेचे लहान मुले या रस्त्यावरून जाताना जीव मुठीत धरतात. वाहनचालकांना अचानक वेग कमी करावा लागतो, त्यामुळे अपघाताचा धोका कायम असतो. विशेष म्हणजे, या मार्गावरच राज्याचे माजी बांधकाम मंत्री आणि विद्यमान पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांचे कार्यालय आहे. डागा बिल्डिंग, अभिनंदन बँकेची मुख्य शाखा याच रस्त्यावर असूनही या रस्त्याची दुरुस्ती अद्याप झालेली नाही. कॅम्प परिसरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांनी महानगरपालिकेकडे वारंवार मागणी केली, परंतु अजूनही कोणतीही ठोस कारवाई दिसत नाही. नागरिकांचा प्रश्न सरळ आहे – आम्ही शहरात सर्वाधिक टॅक्स भरतो, मग आमच्याच रस्त्यांची दुरवस्था का?
महानगरपालिका यावर तातडीने पावले उचलणार का, की नागरिकांना अजूनही खड्ड्यातच प्रवास करावा लागणार? कॅम्प रोडवरील रस्त्यांची दुरुस्ती कधी होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button