Uncategorized

राज्याचे कामगार मंत्री मा. ना. आकाश दादा फुंडकर यांच्या हस्ते गो. से. महाविद्यालय परिसरात ओपन जिम व योगा सेंटरचे थाटात उद्घाटन

स्थानिक विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव येथे १८ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर दरम्यान खामगाव नगरीचे शिल्पकार, माजी नगराध्यक्ष, माजी खासदार, माजी अध्यक्ष विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ तसेच ‘खामगाव रत्न’ स्व. ॲड. शंकरराव उपाख्य भाऊसाहेब बोबडे यांच्या जयंती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने महाविद्यालयाच्या परिसरात इंडोअर स्टेडियमला लागून विद्यार्थ्यांसह प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व खामगावकर नागरिकांच्या उपयोगासाठी अत्याधुनिक ओपन जिम व योगा सेंटर उभारण्यात आले. स्व. भाऊसाहेब बोबडे यांच्या १११ व्या जयंतीनिमित्त महाविद्यालयाच्या वतीने उभारण्यात आलेल्या या भव्य-दिव्य उपक्रमाचे उद्घाटन मा. नामदार आकाश दादा फुंडकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. ओपन जिम आजच्या काळाची गरज असल्याचे प्रतिपादन या वेळी करण्यात आले. आधुनिक जीवनशैलीमुळे वाढत चाललेले आजार, ताणतणाव आणि शारीरिक हालचालींचा अभाव लक्षात घेता आरोग्यदायी समाज घडविण्यासाठी अशा केंद्रांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. महाविद्यालयाच्या परिसरात बसविण्यात आलेल्या जिममध्ये ट्रेडमिल, पुशअप्स व पुलअप्ससाठी रॉड्स, लेग एक्सरसाइजसाठी उपकरणे, सायकलिंग मशीन, डंबेल्स, अ‍ॅब्स व्यायामासाठी बेंचेस यांसारखी आधुनिक साधने उपलब्ध आहेत. विद्यार्थी वर्गाबरोबरच खामगाव शहरातील सर्वसामान्य नागरिकांना या जिमचा मोफत लाभ घेता येणार असून, “सर्वांसाठी आरोग्य” ही संकल्पना यामुळे साकार होणार आहे. यासोबतच योगा सेंटरमध्ये नागरिकांना दररोज सकाळ-संध्याकाळ प्राणायाम, ध्यान, सूर्यनमस्कार व विविध आसने करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शारीरिक बळाबरोबर मानसिक शांतता साधण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे. प्रशिक्षित मार्गदर्शकांच्या मदतीने नागरिक व विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने व्यायाम व योगाभ्यासाचे मार्गदर्शन केले जाणार आहे. या ओपन जिम मध्ये लावण्यात आलेल्या विविध उपकरणांचे पूजनही करण्यात आले. या प्रसंगी मा. डॉ. सुभाष बोबडे (अध्यक्ष, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव), मा. प्रकाश तांबट (उपाध्यक्ष, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव), मा. डॉ. प्रशांत बोबडे (सचिव, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव), मा. अजिंक्य बोबडे (कोषाध्यक्ष,विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव), श्री. निलेश देशमुख,मंडळाचे पदाधिकारी, आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच उपप्राचार्य डॉ. प्रफुल्ल उबाळे, सप्ताह समन्वयक प्रा. डॉ. डी. एन. व्यास, प्रा. डॉ. हनुमंत भोसले, प्रा. डॉ. ए. व्ही. पडघन, प्रा. डॉ. एस. टी. वराळे, प्रा. एन. बी. कुटेमाटे, प्रा. डॉ. मोहम्मद रागिब देशमुख, प्रा. व्ही. यु. मोरे, प्रा. डॉ. ए. ए. तायडे, प्रा. डॉ. डी. टी. अढाऊ, प्रा. डॉ. अनुराग बोबडे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी दिली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button