विद्यापीठात इंग्रजी संवाद कौशल्य पदविका अभ्यासक्रमाकरीता प्रवेश सुरु

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागातर्फे पदव्युत्तर पदविका ‘पी.जी. इन कम्युनिकेशन स्किल्स इन इंग्लिश’ या एक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.
सदर अभ्यासक्रम पदवीधरांसाठी असून करिअरमध्ये उत्कृष्ट संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी उपयुक्त आहे. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळविण्याबरोबरच सादरीकरण कौशल्य, व्यावसायिक लेखन आणि आंतर-सांस्कृतिक संवाद यांसारख्या कौशल्यांवर लक्ष केंद्रित करण्याकरीता सदर अभ्यासक्रम उपयुक्त आहे. अभ्यासक्रमात विद्याथ्र्यांना कॉर्पोरेट क्षेत्र, मीडिया, जनसंपर्क आणि आंतरराष्ट्रीय व्यवसायात आवश्यक असलेले आत्मविश्वास आणि कौशल्ये मिळविण्यास मदत होते.
अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्ये
सदर अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षाचा असून कोणत्याही शाखेतील पदवीधर अभ्यासक्रमाकरीता पात्र असेल. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्याथ्र्यांना शिक्षक, कॉर्पोरेट प्रशिक्षण, मीडिया, जनसंपर्क, ग्राहक संबंध, व्यवसाय संवाद आदींमध्ये करिअरच्या संधी असणार आहे. सदर अभ्यासक्रम व्हच्र्युअल आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीत असणार असून तज्ज्ञ शिक्षकांकडून प्रात्यक्षिक सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.
तरी आजीवन अध्ययन व विस्तार विभागातर्फे सुरु झालेल्या इंग्रजी संवाद कौशल्य पदविका अभ्यासक्रमाकरीता जास्तीतजास्त विद्याथ्र्यांनी प्रवेशित होवून लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक डॉ. श्रीकांत पाटील यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता त्यांचेशी संपर्क साधता येईल.



