सणासुदीत सोन्या-चांदीचे दर उच्चांकी शिखरावर

आज भारतीय कमोडिटी बाजारात सोनं-चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. विशेष म्हणजे चांदीने आज नवा इतिहास रचत प्रति किलो तब्बल ₹1,28,294 चा उच्चांक गाठला आहे. MCX वर चांदीने ₹1,28,612 चा उच्चांकी दर गाठला असून हा 1.1% वाढीसह नवा विक्रम मानला जात आहे. औद्योगिक क्षेत्रातील वाढती मागणी, सोलर पॅनेल्स, इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटऱ्या आणि 5G नेटवर्कमध्ये चांदीच्या वाढत्या वापरामुळे चांदीच्या दरात जोरदार वाढ झाली आहे.
सोन्याच्या किंमतीतही मोठी उसळी पाहायला मिळत असून गुंतवणूकदार दोन्ही मौल्यवान धातूंवर मोठ्या प्रमाणात पैज लावत आहेत. MCX वर सोनं ₹1,09,558 वर व्यवहार करताना दिसत आहे. कालच्या तुलनेत सोन्यात 0.53% वाढ झाली असून इंट्राडे हाय ₹1,09,656 आणि ऑल-टाईम हाय ₹1,09,840 वर पोहोचले आहे.
आजचे सोन्याचे दर:
- 22 कॅरेट सोनं : प्रतितोळा ₹1,02,000 (₹700 ची वाढ)
- 24 कॅरेट सोनं : प्रतितोळा ₹1,11,280 (₹771 ची वाढ)
- 18 कॅरेट सोनं : प्रतितोळा ₹83,460 (₹580 ची वाढ)
सणासुदीच्या काळात सोनं-चांदीने गाठलेला हा उच्चांक गुंतवणूकदारांसाठी चांगली संधी ठरत आहे. बाजारातील वाढत्या भावामुळे सोनं-चांदीत गुंतवणूक करण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



