Crime NewsLatest NewsMaharashtra

शिरजगाव कसबा पोलिसांची धडक कारवाई; ₹६०.८० लाखांचा अवैध रेती ट्रक जप्त

शिरजगाव – पोलीस स्टेशन शिरजगाव कसबाकडून अवैध रेती वाहतुक करणा-या विरूध्द धडक कार्यवाही करण्यात आली असून तब्बल ₹ ६०,८०,००० रू. चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.

मा. पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण श्री. विशाल आनंद यांनी सर्व ठाणेदार यांना आगामी सणांचे अनुषंगाने अवैध व्यवसायावर प्रभावी कार्यवाही करण्याबाबत सुचना दिल्या आहेत.

दिनांक ०९/०९/२०२५ रोजी पोलीस स्टेशन शिरजगाव कसबा येथे पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, पांढ-या रंगाच्या 16 टायरच्या ट्रक मध्ये अवैधरित्या कनान रेती मध्यप्रदेश राज्यातून वाहतुक होत आहे. मिळालेल्या माहीतीनुसार पंचासमक्ष रेड करून आरोपी/ट्रक चालक फैझल खान फिरोझ खान (वय 23 वर्ष, रा. बाडीपुरा, करजगाव, ता. चांदुरबाजार, जि. अमरावती) याच्या ताब्यातून खालील प्रमाणे मुददेमाल जप्त करण्यात आला –

  1. पांढ-या रंगाचा TATA कंपनीचा SIGNA 16 टायर ट्रक क्र. MH40DC2777 कि.अं. ₹ 60,00,000/-
  2. अवैधरित्या वाहतुक केलेली / चोरून आणलेली कनान रेती 10 ब्रास – कि.अं. ₹ 70,000/-
  3. ट्रक चालकाने संपर्कासाठी वापरलेला Redmi 5G कंपनीचा मोबाईल – कि.अं. ₹ 10,000/-

एकूण कि.अं. ₹ 60,80,000/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर बाबत पोलीस स्टेशन शिरजगाव कसबा येथे अपराध क्रमांक 383/2025 कलम 303(2) भारतीय न्याय संहिता सहकलम 130/177 मोटर वाहन कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या गुन्ह्यात सहकार्य करणा-या इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

ही कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण श्री. विशाल आनंद, मा. अपर पोलीस अधिक्षक अमरावती ग्रामीण श्री. पंकज कुमावत, मा. पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. माधवराव गरूड, मा. पोलीस निरीक्षक स्था.गु.शा. श्री. किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि महेंद्र गवई, पोलीस अंमलदार राजेंद्र सोनवने, मनोज पंडीत, अर्जुन परीहार, अजय कुंभरे, विनीत क्षीरसागर आणि सैनिक विनोद नागापुरे यांनी केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button