धक्कादायक! उपसरपंचाच्या डोक्यात गोळी, कारमध्ये आढळला मृतदेह

बीड जिल्ह्यातील गेवराईमधील लुखामसला गावात उपसरपंच गोविंद जगन्नाथ बरगे (वय 38) यांचा मृतदेह कारमध्ये सापडला. त्याच्या डोक्याला गोळी लागल्याचे पाहून पोलिसांमध्ये आत्महत्या की हत्या 1याबाबत संशय निर्माण झाला आहे. कारमध्ये एक पिस्तूल देखील सापडले आहे.
बरगे सोमवारी खासगी कामानिमित्त सोलापूरच्या बार्शीला गेले होते. मात्र मंगळवारी सकाळी सासुरे गावातील शिवारात त्यांचा मृतदेह कारमध्ये आढळला. घटनेची माहिती मिळताच वैराग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन गावडे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि कारची तपासणी केली.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस तपास करत आहेत. बरगे कुटुंबावर यामुळे मोठा दु:खाचा सागर कोसळला आहे. स्थानिक पोलिस पुढील तपासासाठी सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांची माहिती आणि कारमधील वस्तूंची तपासणी करीत आहेत.



