रामपुरी कॅम्पमध्ये कोयत्याचा जीवघेणा हल्ला

रामपुरी कॅम्प येथील चियर्स बर्चया बाजूला रविवारी रात्री रक्तरंजित प्रकार घडला. अमित मनोहर याच्यावर आरोपी भारत घुगे उर्फ मक्खी व अन्य दोन साथीदारांनी कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. तक्रारी नंतर गाडगे नगर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तपास अधिक गतीमान करण्यासाठी गाडगे नगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अतुलकुमार वर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय दौंड आणि पीएसआय राजपूत तपास करत आहेत.
मंगळवारी सकाळी फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी रक्ताचे नमुने गोळा केले. याचबरोबर मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनने फिंगरप्रिंट्स तपासले आणि घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले. या हल्ल्यामागचं कारण काय? हल्लेखोर कोणत्या मानसिकतेने हा जीवघेणा प्रयत्न करत होते? हे सर्व प्रश्न आता गाडगे नगर पोलिसांसमोर उभे ठाकले आहेत. पुढील तपास पोलीस करत असून, आरोपींना लवकरच ताब्यात घेण्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



