Latest NewsMaharashtraPune

MPSC मध्ये पहिली आलेली अश्विनी मृत्यूपुढे हरली, आंघोळीसाठी हिटरने पाणी गरम केलं आणि…,पुणेकरांवर दु:खाचा डोंगर!

पुणे : शेतकऱ्याची लेक एमपीएससीसारख्या परीक्षेत अव्वल येते,ज्यामुळे साऱ्यांना आनंद होतो. पण हा आनंद जास्त काळ टिकत नाही. अवघ्या 2 वर्षात तिचा अपघाती मृत्यू होतो, ज्यामुळे सगळीकडून हळहळ व्यक्त होते. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पालू गावातील अश्विनी बाबुराव केदारी यांचा 28 ऑगस्ट रोजी गिझरच्या पाण्यामुळे अपघात झाला होता. दरम्यान अपघातानंतर आता त्यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच एमपीएससी 2023 च्या पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) परीक्षेत अश्विनी या मुलींमध्ये राज्यात पहिल्या आल्या होत्या. अश्विनी यांनी पिंपरी-चिंचवड येथील डी.वाय. पाटील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने खेड तालुक्यात शोककळा पसरली आहे.

अश्विनीसोबत भीषण घटना
28 ऑगस्ट रोजी पहाटे हा अपघात घडला. अभ्यास करत असताना अश्विनी आंघोळीसाठी पाणी तापवत होत्या. पाण्याचा अंदाज घेण्यासाठी त्या बाथरूममध्ये गेल्या. त्यावेळी हीटरला धक्का लागून उकळते पाणी त्यांच्या अंगावर सांडले. या अपघातात त्या 80% भाजल्या. यानंतर अश्विनी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनी 11 दिवस मृत्यूशी झुंज दिली पण त्यांना यश आले नाही.

उपचारांचा खर्च आणि सामाजातून पाठबळ
अश्विनीच्या उपचारांसाठी मोठा खर्च येत होता. खेड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि सहकाऱ्यांनी आर्थिक मदतीसाठी पुढाकार घेतला. अनेकांनी मदत केली, परंतु नियतीच्या क्रूर खेळापुढे सर्व प्रयत्न अपयशी ठरले.

प्रेरणादायी शैक्षणिक प्रवास
अश्विनीने 2019 मध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी मिळवली आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीला सुरुवात केली. 2022 मध्ये एमपीएससी परीक्षेत निवड न झाल्याने ती खचली नाही. 2023 मध्ये तिने पीएसआय परीक्षेत मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. तिचे ध्येय उपजिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकारी होण्याचे होते.

विद्यार्थ्यांसाठी आदर्श
शेतकरी कुटुंबातील अश्विनीने कठोर परिश्रम आणि जिद्दीने यश मिळवले. कोविड काळात तिने तयार केलेल्या अभ्यास योजनांमुळे अनेक विद्यार्थी तिच्याकडून प्रेरणा घेत होते. तिच्या निधनाने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

१. अश्विनी केदारी यांच्या अपघाताचे कारण काय होते आणि त्यांचे निधन कसे झाले?
२८ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे अश्विनी केदारी आंघोळीसाठी पाणी तापवत असताना गिझरला धक्का लागल्याने उकळते पाणी त्यांच्या अंगावर सांडले. या अपघातात त्या ८०% भाजल्या. त्यांना तातडीने पिंपरी-चिंचवड येथील डी.वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु ११ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्यांचे निधन झाले.

२. अश्विनी केदारी यांनी एमपीएससी परीक्षेत कोणती कामगिरी केली होती?
अश्विनी केदारी यांनी २०२३ च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) परीक्षेत मुलींमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. यापूर्वी २०२२ मध्ये त्या या परीक्षेत निवडल्या गेल्या नव्हत्या, परंतु त्यांनी हार न मानता पुन्हा प्रयत्न केले आणि यश मिळवले.

३. अश्विनी केदारी यांच्या निधनानंतर समाजाने कशी मदत केली आणि त्यांचा विद्यार्थ्यांवर कसा प्रभाव होता?
अश्विनीच्या उपचारांसाठी मोठा खर्च येत असल्याने खेड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांनी आर्थिक मदत गोळा करण्यासाठी पुढाकार घेतला. तथापि, त्या वाचू शकल्या नाहीत. अश्विनी शेतकरी कुटुंबातील असूनही कठोर परिश्रम आणि जिद्दीने यशस्वी झाल्या होत्या. कोविड काळात तिच्या अभ्यास योजनांनी अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली, आणि त्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी आदर्श होत्या.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button