Latest News

भारतीय सैन्यात दु:खद हल्ला – हिमस्खलनात ३ जवान शहीद

लदाखच्या सियाचिन क्षेत्रात हिमस्खलनामुळे भारतीय लष्कराचे तीन जवान शहीद झाले, त्यात दोन अग्निवीरही आहेत. हिमस्खलनाच्या वेळी ही चौकी दबली होती, जिथे हे तीन जवान गस्तीत होते. तात्काळ लष्कराकडून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

या तिन्ही जवान महार रेजिमेंटचे होते आणि त्यांचे मूळ गुजरात, उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्ये आहे. या दुर्घटनेत आणखी पाच जवान अडकले आहेत, तर एका कॅप्टनला वाचवण्यात यश मिळाले आहे.

घटनेनंतर लष्कराने सुरक्षिततेसाठी बचाव मोहिमा हाती घेतल्या असून, सियाचिन परिसरात जवानांची मदत करण्यासाठी तज्ज्ञ टीम पाठवण्यात आली आहे. या घटनेमुळे लष्कर आणि देशभरात गंभीर शोकाचे वातावरण आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button