Crime NewsLatest News

चांदूररेल्वेत पेट्रोल पंप व्यापाऱ्याला लुटले

चांदूर रेल्वे : चांदूररेल्वे शहरात सोमवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. जिजीमाता कॉलनीत पेट्रोल पंप व्यावसायिक श्री. चपालालजी अग्रवाल हे दररोजप्रमाणे पेट्रोल पंपाची रक्कम घेऊन आपल्या घरी परतत होते. मात्र, घरी पोहोचताच त्यांच्या घराच्या फाटकाजवळच अज्ञात व्यक्तींनी अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला.
या हल्ल्यात अग्रवाल यांच्या हातापायाला दुखापत झाली असून, लुटारूंनी त्यांच्या जवळील अंदाजे अडीच ते तीन लाख रुपयांची रोकड हिसकावून पसार झाले.
घटनेनंतर अग्रवाल यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली असून, चांदूररेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण व्यापारी वर्ग आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शहरात वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसी धाक संपुष्टात आल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, या घटनेचा तपास ठाणेदार अजय आकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी करीत आहेत. लुटारू कोण होते? त्यांचा माग कधी लागणार? हा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button